जिल्हाभरात वीकेंड लॉकडाऊला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:21+5:302021-04-11T04:19:21+5:30
रेणापूर शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन तर नागरिकांनी घरातच थांबून शंभर टक्के प्रतिसाद दिला. कडक निर्बंधांमुळे पोलिसांची ...

जिल्हाभरात वीकेंड लॉकडाऊला उत्स्फूर्त प्रतिसाद
रेणापूर शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन तर नागरिकांनी घरातच थांबून शंभर टक्के प्रतिसाद दिला. कडक निर्बंधांमुळे पोलिसांची सतत गस्त सुरू होती. शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. अत्यावश्यक सेवा असलेले दवाखाने, मेडिकल सुरू होते. तुरळक कृषी सेवा केंद्र सुरू होते. शहरासह तालुक्यातील व्यापारी दुकानदार व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर फाटा येथे पोलीस चेक पोस्ट लावण्यात आले होते. स्वतः माचेवाड, पोलीस कर्मचारी व नगरपंचायतीचे कर्मचारी हे विनाकारण फिरणारे तसेच वाहनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनांची चौकशी करीत होते. तसेच दंड आकारण्यात येत होता. सहायक पोलीस निरीक्षक क्रांती निर्मल, पोलीस कर्मचारी किरण शिंदे, कृष्णा शेळके आदी पोलीस कर्मचाऱ्यांची सतत गस्त सुरू होती.