आरसीसीच्या पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST2021-02-05T06:26:18+5:302021-02-05T06:26:18+5:30

यावेळी आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रा. यू. व्ही राव, प्रा. कुरणे व प्रा. जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख मार्गदर्शक ...

Spontaneous response to RCC's parents' meeting | आरसीसीच्या पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरसीसीच्या पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

यावेळी आरसीसीचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रा. यू. व्ही राव, प्रा. कुरणे व प्रा. जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. केमिस्ट्री विभाग प्रमुख प्रा. यू. व्ही. राव यांनी आरसीसी पॅटर्नचे वार्षिक नियोजन व आरसीसी पॅटर्नबद्दल मार्गदर्शन केले. फिजिक्सचे विभागप्रमुख प्रा. कुरणे यांनी अतिशय प्रभावीपणे विद्यार्थ्यांना फिजिक्सबद्दल माहिती दिली. या विषयात तणाव न घेता चांगले यश कसे मिळवता येते, याचे गमक सांगितले. यामुळे या विषयाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती दूर झाली. बायोलॉजीचे विभाग प्रमुख प्रा. जितेंद्र चव्हाण यांनी नीट परीक्षेत बायोलॉजीचे महत्त्व व बायोलॉजीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी कशी तयारी करावी, याचे तंत्र विद्यार्थ्यांना सांगितले. १८० पैकी १८० गुण मिळवलेला आरसीसीचा गुणवंत विद्यार्थी ऋषीकेश हुडगे व स्वप्निल व्यंजने यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन प्रा. बागल यांनी केले.

नीटसाठी आरसीसी पॅटर्न सदैव तत्पर : प्रा. शिवराज मोटेगावकर

प्रमुख मार्गदर्शक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल महत्त्वाच्या ठरणाऱ्या घटकांविषयी पालक व विद्यार्थ्यांना सविस्तर मागदर्शन केले. नीट परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र व्हावेत, यासाठी आरसीसी पॅटर्न सदैव तत्पर व क्रियाशील राहील, याची ग्वाही दिली.

Web Title: Spontaneous response to RCC's parents' meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.