सायकल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:41+5:302021-02-05T06:25:41+5:30
बिडवे लॉन्स येथून स्पर्धेला प्रारंभ झाला. नवीन रेणापूर नाका, परत बिडवे लॉन्स असा या स्पर्धेचा मार्ग होता. स्पर्धेत सहभागी ...

सायकल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बिडवे लॉन्स येथून स्पर्धेला प्रारंभ झाला. नवीन रेणापूर नाका, परत बिडवे लॉन्स असा या स्पर्धेचा मार्ग होता. स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. ९.३० व ५० किलोमीटर या प्रत्येक गटात पुरुष व स्त्रियांमधून प्रत्येकी तिघांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. लातूरसह उदगीर, रेणापूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील स्पर्धक यात सहभागी झाले होते. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सपत्नीक स्पर्धेत सहभाग घेतला. दोघांनीही नऊ कि.मी. अंतराचा टप्पा यशस्वी पार केला. दरम्यान, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मनपा आयुक्त अमन मित्तल, रोटरीचे अध्यक्ष अनुप देवणीकर, प्रसाद वारद, आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी आदींनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
पालकमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश
पालकमंत्री अमित देशमुख या स्पर्धेमध्ये सहभागी होणार होते. परंतु, तातडीच्या पक्ष बैठकीमुळे ते येऊ शकले नाही. पालकमंत्र्यांच्या वतीने शुभेच्छा संदेश पाठविण्यात आला होता. या संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. लातूर शहराला स्वच्छ, सुंदर, हरित व निरोगी ठेवावे. प्रदूषण वाढू नये, याची काळजी घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला.