शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट ट्रकने घेतला टेम्पाे चालकाचा बळी; लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात

By राजकुमार जोंधळे | Updated: March 10, 2023 19:00 IST

हा अपघात एवढा भीषण हाेता की टेम्पाेचा पार चेंदामेंदा झाला आहे.

लातूर : भरधाव ट्रकने समोरून आयशर टेम्पोला जोराची धडक दिल्याची घटना लातूर-नांदेड महामार्गावरील कोळपा गावानजीक रात्री उशिरा घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या टेम्पोचालकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील भातांगळी येथील खयमाेद्दीन ऊर्फ खय्युम सत्तारसाहब सय्यद (वय ३०) हे आयशर टेम्पाे (एम.एच. २४ ए.यू. ३३५७) घेऊन लातूरकडून भातांगळी गावाकडे गुरुवारी रात्री उशिरा निघाले हाेते. दरम्यान, काेळपा पाटीनजीक आल्यानंतर एका वाहनाच्या शाेरूमसमाेर नांदेडकडून लातूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या ट्रकने (एम.एच. २६ बी.ई. ७२७२) टेम्पाेला समाेरून जाेराची धडक दिली. या अपघातात टेम्पाेचालक खय्युम सय्यद हा गंभीर जखमी झाला. त्याच्या दाेन्ही पायाला, छातीला, ताेंडाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर ट्रक चालकाने आपले वाहन जागेवरच साेडून धूम ठाेकली. या अपघाताची माहिती विवेकानंद चाैक पाेलिसांना मिळाली असता, त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत गंभीर जखमी झालेल्या टेम्पाे चालकाला एका वाहनातून लातूरच्या शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना टेम्पाे चालकाचा शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी दिली. याबाबत ताजाेद्दीन सत्तारसाहब सय्यद (वय ३८) यांनी दिलेल्या व तक्रारीवरून विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस उपनिरीक्षक महेश गळगटे करत आहेत.

टेम्पाेचा चेंदामेंदा; चालकही अडकला...लातूर येथून भातांगळी गावाकडे जात असलेल्या टेम्पाेस लातूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने समाेरून जाेराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण हाेता की टेम्पाेचा पार चेंदामेंदा झाला आहे. टेम्पाेचे केबिन पूर्णत: दबल्याने त्यात टेम्पाे चालक अडकला. पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्रा कापून जखमी टेम्पाे चालकाला बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सुसाट ट्रकने घेतला टेम्पाे चालकाचा बळी...टेम्पाे चालक खय्युम सय्यद आपल्या दिशेने जात हाेताे. मात्र, सुसाट आलेला ट्रक टेम्पाेवर समाेरून जाेराने आदळला. या अपघातात टेम्पाेचे जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले आहे. काही कळायच्या आतच भरधाव ट्रकने टेम्पाेचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. या अपघाताने टेम्पाे चालकाचा बळी घेतला आहे. हयगय व निष्काळजीपणा चालकाच्या जिवावर बेतला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूlaturलातूर