शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रक दुभाजकावर आदळला, लातूर-बार्शी मार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 20:16 IST

हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एमआयडीसी पाेलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लातूर : बार्शी मार्गावरून भरधाव जात असलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुभाजकावर जाऊन आदळला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, भरधाव ट्रक दुभाजकावर अडकल्याने दाेन्ही बाजूंच्या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक बालंबाल बचावले आहेत. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एमआयडीसी पाेलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लातूर शहरातील पाच नंबर चाैकात बार्शी मार्गावरील पेट्रोलपंपासमोरील दुभाजकावर लातूरकडे येणारा भरधाव ट्रक (एमएच २५-एजे ९९३०) अचानक दुभाजकावर चढला. या अपघातामध्ये दुभाजकातील विद्युत पोलचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. यावेळी डाव्या आणि उजव्या बाजूच्या रस्त्यावर वाहनांची माेठी वर्दळ हाेती. दुभाजकावर चढलेला ट्रक जाग्यावरच बंद पडल्याने माेठे नुकसान झाले नाही. काही कळायच्या आतच हा प्रकार घडल्याने वाहनधारकांचा एकच गाेंधळ उडाला आणि बघ्यांची एकच गर्दी झाली. या अपघाताची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याला मिळाली. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देऊन ट्रक चालकाला ताब्यात घेतले. शिवाय, अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून ताे ताब्यात घेण्याचे काम पाेलिसांकडून सुरू होते.

क्षणात घडला अपघाताचा थरार...रस्त्यालगत छाेटे-छाेटे हातगाडेवाले, व्यावसायिक आहेत. मात्र, बार्शी मार्गावरून भरधाव लातूर शहराच्या दिशेने आलेला ट्रक काही कळायच्या आत दुभाजकावरील विद्युत पाेल ताेडून दुभाजकावर चढला. हा अपघाताचा थरार पाहून अनेकजण रस्त्याच्या बाजूला पळाले.

काही वाहनधारक बालंबाल बचावले...चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक दुभाजकावर चढला. यावेळी लातुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या काही वाहनधारकांना अचानकपणे ट्रक अंगावर आल्याचा भास झाला. यामध्ये काही वाहनधारक बालंबाल बचावल्याचे घटनास्थळावर भेट दिलेल्या पाेलिसांनी सांगितले. 

टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरPoliceपोलिस