‘स्पीडगन’ने राेखला ४५९१ वाहनांचा वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:58+5:302021-02-05T06:25:58+5:30
धावत्या वाहनांचा माेजला जाताे वेग... लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने स्पीडगन व्हॅनच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गावरील धावत्या वाहनांचा वेग माेजला ...

‘स्पीडगन’ने राेखला ४५९१ वाहनांचा वेग
धावत्या वाहनांचा माेजला जाताे वेग...
लातूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने स्पीडगन व्हॅनच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गावरील धावत्या वाहनांचा वेग माेजला जाताे. यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. या वाहनाच्या माध्यमातून जवळपास ५०० मीटर अंतरावरून येणाऱ्या वाहनाची स्पीड माेजली जाते. भरधाव आणि बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना ऑनलाईन दंड केला जाताे. ही माेहीम लातूर शहरातील मार्गासह जिल्ह्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर वर्षभर राबविली जाते. यातून वाहनांच्या वेगाला लगाम घालण्याचा प्रयत्न पाेलिसांकडून सुरू आहे.
वेगावर नियंत्रण ठेवा...
लातूर शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय, आपल्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावा. यातून अपघाताच्या घटना राेखता येणार आहे. पाेलीस प्रशासनाच्या वतीने बेशिस्त आणि भरधाव वाहनधारकांवर कारवाई केली जाते. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- निखिल पिंगळे,
पाेलीस अधीक्षक,