लसीकरणाला वेग; १०७३ हेल्थ केअर वर्कर्सना डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:18 IST2021-01-22T04:18:20+5:302021-01-22T04:18:20+5:30
केंद्रनिहाय लसीकरण १६, १९ व २० जानेवारी रोजी १ हजार ७३ जणांना लस देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय ...

लसीकरणाला वेग; १०७३ हेल्थ केअर वर्कर्सना डोस
केंद्रनिहाय लसीकरण
१६, १९ व २० जानेवारी रोजी १ हजार ७३ जणांना लस देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत १६८, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय १६४, सामान्य रुग्णालय उदगीर २२३, ग्रामीण रुग्णालय औसा १५९, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर १८७ आणि ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे १७२ जणांनी लस घेतली.
२० जानेवारी रोजी केंद्रनिहाय साध्य झालेले उद्दिष्ट
२० जानेवारी रोजी एकूण ४७३ हेल्थ केअर वर्कर्सनी लस घेतली. त्यात सामान्य रुग्णालय उदगीर येथे ११८, ग्रामीण रुग्णालय औसा ६५, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर ७७, ग्रामीण रुग्णालय मुरुड ५९, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था ८८, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय ६६ जणांनी लस घेतली. ६०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४३८ जणांनी लस घेतली. सदर उद्दिष्ट ७८.८३ टक्के आहे.
जिल्ह्याला २०९८० व्हॅक्सीनचे डोस प्राप्त झाले आहे. व्हॅक्सीन देताना १.०१ वेस्टेज ग्राह्य धरले तर एका बाटलीमध्ये दहा डोस देता येतात. आपल्याकडे लस देणारे एक्सपर्ट आहेत. त्यामुळे यापेक्षा वेस्टेज कमी आहे. गेल्या तीन दिवसांत १०७३ हेल्थ वर्कर्सना लस दिली आहे.
-डॉ.एल.एस. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक