विशेष पाेलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:59+5:302021-03-21T04:18:59+5:30

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक निसार तांबोळी यांचा कासार सिरसी येथे विविध सेवाभावी संस्था, व्यापारी महासंघ, पोलीस पाटील संघटनेच्यावतीने ...

Special Inspector General of Police Nisar Tamboli felicitated | विशेष पाेलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांचा सत्कार

विशेष पाेलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांचा सत्कार

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक निसार तांबोळी यांचा कासार सिरसी येथे विविध सेवाभावी संस्था, व्यापारी महासंघ, पोलीस पाटील संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. विशेष पाेलीस महानिरीक्षक तांबोळी यांनी शनिवारी कासार सिरसी येथील पोलीस ठाण्याला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाले, उपनिरीक्षक प्रताप गरजे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाच्यावतीने विशेष पाेलीस महानिरीक्षक तांबोळी यांना मानवंदना देण्यात आली. तांबोळी हे मूळचे शिरूर अनंतपाळ येथील रहिवासी असून, त्यांनी पोलीस खात्यात केलेल्या कामगिरीबाबत यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाले आहे. यावेळी कासार सिरसी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला कासार शिरशी येथील उपसरपंच बडे, साहेब लकडहरे, जिलानी बागवान, पिंटू सौदागर, श्याम मुळजकर, लातूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर केंगारे, हुसेन सैय्यद यांच्यासह कासार बालकुंदा व मदनसुरी परिसरातून अनेक चाहते उपस्थित होते.

Web Title: Special Inspector General of Police Nisar Tamboli felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.