विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केली जळकोट ठाण्याची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST2021-03-20T04:17:59+5:302021-03-20T04:17:59+5:30
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता येथील पोलीस ठाण्यात भेट देऊन पाहणी केली. ...

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केली जळकोट ठाण्याची तपासणी
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता येथील पोलीस ठाण्यात भेट देऊन पाहणी केली. ठाण्याअंतर्गत कायदा व व्यवस्थेचे पालन होते की नाही, याची चौकशी केली. तसेच पोलिसांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी जळकोट पोलीस ठाण्याची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच जळकोट येथील पत्रकार संघाच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील विविध पक्ष, सामाजिक संघटनांनीही सत्कार केला. जळकोट पोलीस ठाण्याचे काम समाधानकारक असल्याचे सांगून विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी म्हणाले, जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. पोलीस प्रशासन आपल्यासोबत आहे. जनता आणि पोलिसांमध्ये दुरावा ठेवू नये. सर्वांनी आपल्या गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही केले.