बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीनची पेरणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:15+5:302021-06-20T04:15:15+5:30

उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील शेतकरी गोविंद पांडुरंग तरवडे यांच्या शेतावर कृषी विभागामार्फत आयोजित बीबीएफद्वारे सोयाबीनची पेरणी प्रात्यक्षिकप्रसंगी राज्यमंत्री ...

Soybeans should be sown using BBF technology | बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीनची पेरणी करावी

बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीनची पेरणी करावी

उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील शेतकरी गोविंद पांडुरंग तरवडे यांच्या शेतावर कृषी विभागामार्फत आयोजित बीबीएफद्वारे सोयाबीनची पेरणी प्रात्यक्षिकप्रसंगी राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी कल्याण पाटील, श्याम डावले, दत्ता बामने, नागेश धोंटे, पंचायत समिती सदस्य माधव कांबळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, कृषी विभागाच्या माहितीनुसार उदगीर तालुक्यात पेरणीयोग्य पर्जन्यमान झालेले आहे. उदगीर तालुक्यातील मुख्य पीक हे सोयाबीन असून, या पिकाचे चांगले उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लागेल. तरी सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी रुंद वरंबा सरी पद्धतीचा वापर करावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी शेती पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी वापर करणे ही काळाची गरज असून कृषी विभागाने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. वाढवणा बु. येथील प्रात्यक्षिक राज्यमंत्री बनसोडे यांनी स्वतः पेरणी करून केले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Soybeans should be sown using BBF technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.