सोयाबीनला विक्रमी ६,४८० रुपयांचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST2021-04-08T04:19:51+5:302021-04-08T04:19:51+5:30
लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये सोयाबीनला विक्रमी भाव मिळत असून, मंगळवारी सर्वसाधारण दर ६ हजार ४८० ...

सोयाबीनला विक्रमी ६,४८० रुपयांचा दर
लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये सोयाबीनला विक्रमी भाव मिळत असून, मंगळवारी सर्वसाधारण दर ६ हजार ४८० रुपये प्रति क्विंटल दर निघाला. तर कमाल ६ हजार ५१९ आणि किमान ६ हजार ४३६ रुपयांचा दर होता.
सध्या बाजार समितीमध्ये ५ हजार ६३४ क्विंटलची आवक असून, भाव चांगला मिळाला असला तरी सध्या आवक कमी झाली आहे. भाव मात्र वाढला आहे. हरभऱ्याची आवक ९ हजार ८५३ क्विंटल असून, सर्वसाधारण दर ५ हजार रुपये प्रति क्विंटल आहे. तर तुरीची आवक २ हजार ४७० क्विंटल असून, दर ६ हजार ८५० प्रति क्विंटल आहे. कमाल दर ७ हजार ७० आणि किमान दर ६ हजार ४०१ रुपये आहे. गहू, ज्वारी, हायब्रीड, रब्बी ज्वारी, करडई, अंबाडी, चिंच, चिंचोका आदी शेतमालाची आवक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात आहे. सिझनपासूनच सोयाबीन, हरभरा, तूर या पिकांना हमीभावापेक्षा अधिक दर मार्केट यार्डात मिळाला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावर शेतमाल न देता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातच शेतमाल देणे पसंत केले.
सध्या गव्हाची आवक २ हजार ९ क्विंटल तर हायब्रीड ज्वारीची आवक २२७ क्विंटल असून, ज्वारीला २००० रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर मिळत आहे.