शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

आवक मंदावल्याने साेयाबीनचे प्रति क्विंटल दर स्थिर! लातुरात काय स्थिती, जाणून घ्या

By राजकुमार जोंधळे | Updated: December 18, 2023 22:19 IST

१३,२७१ क्विंटल आवक; प्रति क्विंटलला ४६०० रुपयांचा दर

राजकुमार जाेंधळे, लातूर: शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या साेयाबीनसह इतर शेतमालाची आवक मंदावली आहे. परिणामी, साेयाबीनचे प्रति क्विंटलचे दर स्थिर झाले आहेत. तर शनिवारी लातूरच्या आडत बाजारात १३ हजार २७१ क्विंटलची आवक झाली.

साेयाबीनला प्रति क्विंटल किमान दर ४ हजार ६०० रुपयांचा मिळाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामाेडी आणि देशातील केंद्र सरकारच्या धाेरणामुळे शेतमालाच्या दरात चढ-उतार हाेत असतात. दिवाळीपूर्वी साेयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला हाेता. आता ताेच दर दिवाळीनंतर घसरला आहे. साेयाबीनची आवक घसरण्याबराेबरच दरातही घसरण झाली आहे. लातुरातील बाजार समितीत दैनंदिन हाेणारी साेयाबीनची आवक १३ हजारांवर आली आहे. आता दरही ४ हजार ५०० रुपयांवर स्थिरावले आहेत.

तारण याेजनेचा लाभ घ्यावा

बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी तारण याेजना सुरू केली असून, ७० टक्के कर्ज उचल म्हणून दिले जाते. या याेजनेचा शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असून, बाजार समितीच्या तारण याेजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. - सतीश भाेसले, सहसचिव, बाजार समिती, लातूर

भविष्यात दर वाढण्याची आशा

साेयाबीनला सध्या मिळणारा दर हा समाधानकारक नाही. मात्र, भविष्यात दर वाढण्याची आशा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामाेडीवर हे दर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांनी गरज असेल तरच साेयाबीन विक्री करावी, अन्यथा तारण याेजनेचा लाभ घ्यावा.-अशाेक अग्रवाल, व्यापारी, लातूर

टॅग्स :Soybeanसोयाबीनlaturलातूर