सोयाबीनची आवक घटली; दर उच्चांकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST2021-05-07T04:20:22+5:302021-05-07T04:20:22+5:30
लातूर बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुळ ३९२, गहू ५०८, ज्वारी हायब्रीड ८, ज्वारी रबी ३७८, मका ७, हरभरा ८९६०, ...

सोयाबीनची आवक घटली; दर उच्चांकी !
लातूर बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुळ ३९२, गहू ५०८, ज्वारी हायब्रीड ८, ज्वारी रबी ३७८, मका ७, हरभरा ८९६०, तूर १९९७, मूग ४९, एरंडी १३, करडई ५८, सोयाबीन ४४४२, चिंच १८३८, चिंचोका १३४७ क्विंटलची आावक राहिली. चिंचाला प्रति क्विंटल ६ हजार ४००, कमाल ४५५१ किमान आणि ५ हजार ५०० सर्वसाधारण दर होता.
हरभऱ्याचा दर ४ हजार ९००
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गुरुवारी हरभऱ्याची आवक ८ हजार ९६० क्विंटल होती. हरभऱ्याला कमाल दर ४९८७, किमान ४८७१ तर सर्वसाधारण ४९०० प्रति क्विंटल दर होता. जो की, हमीभावापेक्षा अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा तूर, हरभरा, सोयाबीन आदी शेतमालाची विक्री मार्केट यार्डात करणे पसंत केले आहे.