जावईच निघाला मारेकरी; चाकूर येथील हत्या प्रकरणाचा झाला उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 17:10 IST2018-07-16T17:07:46+5:302018-07-16T17:10:21+5:30
रविवारी रात्री व्यंकट नंदगावे यांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून नदंगावे यांच्या जावयानेच त्यांची हत्या केल्याचे आज उघडकीस झाले.
_201707279.jpg)
जावईच निघाला मारेकरी; चाकूर येथील हत्या प्रकरणाचा झाला उलगडा
चाकूर (लातूर ) : रविवारी रात्री व्यंकट नंदगावे यांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून नदंगावे यांच्या जावयानेच त्यांची हत्या केल्याचे आज उघडकीस झाले.
या बाबत अधिक माहिती अशी कि, व्यंकट नंदगावे (रा.राचन्नावाडी) हे रविवारी रात्री बोथी चौकात गावाकडे जाण्यासाठी गाडीची वाट पाहत थांबले होते. याच दरम्यान ९.४५ वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
याप्रकरणी चाकूर पोलिसांची तीन पथके आरोपीचा शोध घेत होती. उदगीर येथे नंदगावे यांचे जावई पुंडलिक काळे राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच काही दिवसांपूर्वी नंदगावे यांचे जावयासोबत वाद झाला होता. यावरून माग काढत पोलिसांनी काळे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक रामेश्वर तट यांनी दिली.