चाकूरच्या यशने बनविली सोलरवर चालणारी सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:07+5:302021-03-07T04:18:07+5:30
चाकूर येथील जगत् जागृती विद्यालयात शिक्षण घेण्याऱ्या यश होनकर याला नेहमीच काही ना काही नवीन प्रयोग करण्याचा छंद आहे. ...

चाकूरच्या यशने बनविली सोलरवर चालणारी सायकल
चाकूर येथील जगत् जागृती विद्यालयात शिक्षण घेण्याऱ्या यश होनकर याला नेहमीच काही ना काही नवीन प्रयोग करण्याचा छंद आहे. त्याच्या या उपक्रमाला त्याचे वडील सुजित होनकर नेहमीच प्रोत्साहन देतात. यश याने जुन्या वापरातील सायकलला शेतात फवारणी यंत्राच्या दोन बॅटऱ्या आणि मोटार, सोलर पॅनेल, दुचाकीचे एक किट याच्या मदतीने हे सर्व यंत्र सायकलला जोडून सोलरवर चालणारी सायकल तयार केली आहे. एकदा सोलरवर चार्ज केल्यानंतर साधारणपणे २० ते २२ किलोमीटरचे अंतर ही साेलर सायकल पार करते. याला सोलर चार्जिंग आणि विद्युत चार्जिंग असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. त्यानुसार सायकलची बॅटरी चार्ज केली जाते. ही सोलरवर चालणारी सायकल बनविण्यासाठी सायकलसह आठ हजार रुपयांचे साहित्य लागले आहे. बाजारात इलेक्ट्रॉनिक सायकलच्या किमती जवळपास ४० हजारांच्या घरात आहेत. मात्र, एका जुन्या सायकलला यंत्राची जोड देत केवळ आठ हजारांत सोलर सायकल तयार केली आहे. सोलर सायकलचा वापर यश नेहमीच करतो. याच सायकलवरून चाकूर शहरात फिरतो. शाळेत याच सायकलवरून जातो. यशने यापूर्वी तेलाच्या डब्यापासून कुलर बनविले हाेते. टाकाऊ डब्यापासून कुलरची निर्मिती केली आहे. यशच्या यशाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. याबद्दल जगत् जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील, मुख्याध्यापक प्रल्हाद तिवारी, पर्यवेक्षक संजय नारागुडे, उमाकांत चलवदे, चंद्रशेखर भालेराव, सुनील येंचेवाड, अरविंद तोंडारे, अमोल शेटे, आदींनी केले आहे.