सौरऊर्जा प्रकल्पामुळे पाणीपुरवठा वीजबिलात प्रतिमहा १० लाखांची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:25+5:302021-06-19T04:14:25+5:30
पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, लातूर मनपा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा हा पहिला टप्पा असून, याच जलशुद्धिकरण केंद्र परिसरात ६०० ...

सौरऊर्जा प्रकल्पामुळे पाणीपुरवठा वीजबिलात प्रतिमहा १० लाखांची बचत
पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, लातूर मनपा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा हा पहिला टप्पा असून, याच जलशुद्धिकरण केंद्र परिसरात ६०० किलोवॅटचा दुसरा सौरऊर्जा प्रकल्प होत असून, महापालिकेमार्फत इतर योजनेतून रेणापूर तालुक्यातील पाथरवाडी येथे पाच मेगावॅटचा आणखी एका सौरऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या तीन प्रकल्पांतून साडेसहा मेगावॅट वीज निर्माण केली जाणार आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हरंगुळ जलशुद्धिकरण केंद्र परिसरातील सौरऊर्जा प्रकल्प अमृत योजनेअंतर्गत होत असून, ३ कोटी ४१ लाखांचा निधी प्रस्तावित आहे. हरंगुळ जलशुद्धिकरण केंद्राचे पाणीपुरवठ्यासाठी महावितरण कंपनीकडून वापरल्या जाणाऱ्या विजेचे प्रतिमहा बिल ३० लाखांपर्यंत येते. वीज वापर हा प्रतिमहा ३ लाख ८० हजार युनिट असून, सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सरासरी प्रतिमहा दहा लाख रुपयांची बचत होणार आहे.
पालकमंत्र्यांनी केला शहर बसमधून प्रवास...
शहर महापालिकेला शहर बसवाहतूक व्यतिरिक्त अतिरिक्त सहा ठिकाणी विस्तारीत बससेवा सुरू करण्यास राज्य परिवहन महामंडळाने ना हरकत दिली आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी बांधकाम भवन-गंजगोलाई-गंगापूर विस्तारीत शहर वाहतूक बससेवेस पालकमंत्री अमित देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. यावेळी त्यांनी बांधकाम भवन ते बायपास रोडपर्यंत शहर वाहतूक बसमधून प्रवास केला.