सामाजिक कार्यकर्त्या निर्मला डोळे यांचे निधन
By Admin | Updated: September 4, 2016 13:59 IST2016-09-04T13:59:08+5:302016-09-04T13:59:08+5:30
शिक्षणतज्ज्ञ आणि आदर्श प्राचार्य, थोर विचारवंत ना. य. डोळे यांच्या पत्नी, माजी नगरसेविका, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला डोळे (८४ वय) यांचे रविवारी पहाटे निधन झाले.

सामाजिक कार्यकर्त्या निर्मला डोळे यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. ४ - शिक्षणतज्ज्ञ आणि आदर्श प्राचार्य, थोर विचारवंत ना. य. डोळे यांच्या पत्नी, माजी नगरसेविका, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला डोळे (८४ वय) यांचे रविवारी पहाटे निधन झाले.
उदगीर येथील सामजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात स्वतंत्र वलय निर्माण केलेल्या निर्मला काकू डोळे यांचे रविवारी पहाटे खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तुरुंगवास भोगलेल्या डोळे काकुंनी १९६२ साली उदगीर येथे आल्यानंतर नगरसेविका, महिला दक्षता समिती अध्यक्षा, नवसमाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी विद्यालयाच्या अध्यक्षा अशी अनेक पदे भूषवली.
राष्ट्र सेवादल, समाजवादी पक्ष व जनता पार्टी मध्ये कार्यकर्ता ते पदाधिकारी असा प्रवास करुन सक्षम कार्याचा ठसा उमटविला. उदगीर येथे रविवारी दुपारी निर्मला काकुंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उदगीरसह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
निर्मला डोळे यांच्या पश्चात दोन मुले जयदेव डोळे पत्रकार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात तर देवप्रिय डोळे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. एक मुलगी वसुंधरा डोळे-देशमुख, याशिवाय सुना व नातवंडे असा परिवार आहे.