सामाजिक संस्थांनी वृक्ष संवर्धन मोहीम राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST2021-07-31T04:20:57+5:302021-07-31T04:20:57+5:30
येथील श्री अनंतपाळ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राज्य मार्गावरील दुभाजकात लागवड करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ...

सामाजिक संस्थांनी वृक्ष संवर्धन मोहीम राबवावी
येथील श्री अनंतपाळ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून राज्य मार्गावरील दुभाजकात लागवड करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, दगडू साळुंखे, मंगेश पाटील, ॲड. गणेश सलगरे, संतोष शेटे, गणेश धुमाळे, धोंडिराम सांगवे, भारत कोंडेकर, ॲड. ज्ञानेश्वर चेवले, प्रभाकर कुलकर्णी, बापुराव देवंगरे, किशनराव इंदलकर, शिवराज शेरसांडे, उमाकांत देवंगरे, वैजनाथ नाब्दे, शंकर बेंबळगे, धनाजी लखनगावे, नरेंद्र शिवणे, किरण कोरे, सुमित दुरुगकर यांची उपस्थिती होती.
येथील श्री अनंतपाळ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने शहरातील दुभाजकात फाॅक्सटेल, आरेका पाम, बाॅटम पाम या जातीचे वृक्ष ५० हजार रु. खर्चून लावण्यात आले आहेत. यावेळी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात गावोगावी वृक्षारोपण मोहीम राबविली जाते. परंतु वृक्षारोपणानंतर त्याकडे पाठ फिरवली जात आहे. वृक्ष लागवड केल्यानंतर त्याचे संगोपन, संवर्धन करणे आवश्यक आहे.
संस्थेच्या उपक्रमास मदत...
येथील अनंतपाळ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमात अडचणी येत असतील तर आपण सर्वतोपरी मदत देणार असल्याचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. यावेळी प्रभाकरराव कुलकर्णी यांचेही मार्गदर्शन झाले.