ग्रीन लातूर वृक्ष टीमचा सामाजिक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:21 IST2021-05-06T04:21:08+5:302021-05-06T04:21:08+5:30
भारत विकास परिषदेचा मदतीचा हात लातूर : भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने गरजू कोरोना बाधित रुग्णांना सहाय्य व्हावे ...

ग्रीन लातूर वृक्ष टीमचा सामाजिक उपक्रम
भारत विकास परिषदेचा मदतीचा हात
लातूर : भारत विकास परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीने गरजू कोरोना बाधित रुग्णांना सहाय्य व्हावे यासाठी पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नुकतेच त्याचे लोकार्पण करण्यात आले. परिषदेच्या वतीने यापूर्वीही २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा संघचालक सीए संजय अग्रवाल व विवेक अयाचित यांच्या हस्ते या मशिनचे लोकार्पण पार पडले. यावेळी भारत विकास परिषदेचे शाखा अध्यक्ष सुधाकर जोशी,
उपाध्यक्ष विजय जाधव, अमित कुलकर्णी, विश्वास लातूरकर,योगेश काळे, भुषण दाते, बालाजी बिराजदार, अमोल बनाळे, अमित देवणे, शिरीष कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या मशिनच्या सहाय्याने गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळवणे सोपे होणार आहे.
श्यामनगर येथे गरजू कुटुंबांना अन्नधान्य कीट वाटप
लातूर - सध्याची कोरोनामुळे झालेली बिकट परिस्थिती पाहता काही कुटुंबामध्ये अन्नधान्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे विजय टाकेकर यांच्या पुढाकारातून क्रांतीज्योती सेवाभावी संस्थेतर्फे श्याम नगर, आलमपुरा भागातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे विजय टाकेकर, सचिव संजय क्षीरसागर, बालाजी बादाडे, अनिल सुरनर, भालचंद्र अंधारे, श्रीमंत पवार, विक्रम टाकेकर यांची उपस्थिती होती.