शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

कर्नाटकातून झाेपेच्या गोळ्यांची लातुरात तस्करी; ३५० गोळ्यांसह युवकाला पकडले

By राजकुमार जोंधळे | Updated: August 29, 2022 17:26 IST

लातूर शहरात सध्याला झाेपेच्या गाेळ्या काही मेडिकलवर, टपरीवरुन विक्री हाेत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पाेलिसांना मिळाली.

लातूर : झाेपेच्या ३५० गाेळ्यासह एका युवकाला लातूर पाेलिसांनी पकडले असून, त्यांच्या विराेधात शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात सध्याला झाेपेच्या गाेळ्या काही मेडिकलवर, टपरीवरुन विक्री हाेत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक प्रविण राठाेड यांनी सुतमील राेड परिसरात एका युवकाला पकडण्यात आले. ताे झाेपेच्या गाेळ्या विक्री करत असल्याचे आढळून आले. दरम्यान, सापळा रचून पाेलीस आणि अन्न औषध प्रशासन कार्यालयाच्या पथकाने संयुक्तपणे त्यास ताब्यात घेत पंचनामा केला.

घटनास्थळी मारलेल्या छाप्यात चाकूर तालुक्यातील दापक्याळ येथील सुमित संताेष कासले (वय २२) या युवकाला पकडले असून, १० एमजीच्या ३५० गाेळ्यांचे दाेन बाॅक्स जप्त केले आहेत. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सुमित कासले याच्याविराेधात गुरनं. ३७४ / २०२२ कलम २७६, ३२८, ३३६ भादंविसह कलम ८ (क), २१, २२ (२२), २९ अमली औषधी द्रव्य व मनप्रीावी पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

रॅकेचा पाेलिसांकडून शाेध...लातुरात चाेरट्या मार्गाने विविध मेडिकल, पानटपरीवर झाेपेच्या गाेळ्या विक्रीसाठी पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा शाेध लातूर पाेलीस घेत आहेत. रॅकेट हाती लागल्यानंतर गुन्ह्यांची व्याप्ती आणि त्यांच्या कारनाम्याची माहिती समाेर येणार आहे.

पाेलिसांनी दुसऱ्यांदा मारला छापा...औरंगाबादपाठाेपाठ लातूर पाेलिसांनी झाेपेच्या, गुंगीच्या गाेळ्या विक्री करणाऱ्या मेडिकल, पानटपरीवर यापूर्वी एकदा छापा मारला हाेता. दरम्यान, या कारवाईत त्यांनी माेठ्या प्रमाणावर गाेळ्यांचा साठाही जप्त केला आहे. आता सुतमीलराेड परिसरात केलेली ही कारवाई दुसऱ्यांदा आहे. अशा गाेळ्यांच्या विक्रीवर पाेलिसांची करडी नजर आहे.

कर्नाटकातील गाेळ्या लातुरात...शेजारच्या कर्नाटक राज्यातून चाेरट्या मार्गाने झाेपेच्या, गुंगीच्या गाेळ्यांचा पुरवाठा करणारे रॅकेट सक्रिय असल्याच्या वृत्ताला पाेलिसांनीही दुजाेरा दिला आहे. लातूरलगत असलेल्या सीमाभागातून या गाेळ्या लातुरात येत असल्याची माहिती पाेलिसांकडे आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. - निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर