जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे...
लातूर - मुंबई
कोल्हापूर - धनबाद
हैदराबाद - हडपसर
नांदेड - पनवेल
कोल्हापूर - नागपूर
प्रवासी म्हणतात...
कामानिमित्त मुंबईला नियमित जाणे असते. कोरोनामुळे रेल्वेसेवा बंद होती. परिणामी, गैरसोयीचा सामना करावा लागला. सध्या रेल्वे सुरू झाल्याने वेळ आणि पैशांची बचत होत आहे. रेल्वे सेवा सुरू झाल्याने गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. लातूरहून मुंबईला जाणाऱ्यांची लातूर-मुंबई रेल्वेलाच सर्वाधिक पसंती आहे. या निर्णयामुळे मदत झाली आहे.
- ऋषिकेश महामुनी, प्रवासी
सध्या लातूरहून सहा रेल्वे सुरू झाल्या आहेत. पंढरपूर, निजामाबाद, परळी-मिरज या दोन पॅसेंजर बंद आहेत. कोरोनाची परिस्थिती कमी झाल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रेल्वे बंद होती त्या काळात खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला होता. दरम्यान, आता रेल्वेसेवा सुरू झाल्याने गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.
- बालाजी जाधव, प्रवासी
प्रवाशांची सोय...
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे बंद असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. दरम्यान, रेल्वेसेवा सुरू झाल्याने प्रवाशांची साेय झाली आहे.
आरक्षणही सुरू...
लातूरहून इतर शहराला जाण्यासाठी प्रवासी रेल्वेचा आधार घेतात. सध्या कोरोनाची परिस्थिती कमी झाल्याने बाहेरगावी जाण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या वतीने आरक्षणही सुरू करण्यात आले आहे.
लातूर रेल्वेस्थानक प्रशासनाच्या वतीने स्थानकावर मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करण्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या जातात. दरम्यान, सर्वच मार्गावरील रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लातूर रेल्वेस्थानकाचे प्रबंधक बी.के. तिवारी यांनी सांगितले.