स्मार्ट व्हिलेज निवड समितीने केली गंगापूरची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST2021-03-14T04:19:09+5:302021-03-14T04:19:09+5:30
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ...

स्मार्ट व्हिलेज निवड समितीने केली गंगापूरची पाहणी
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, डॉ. कापसे, डॉ. किरण गोरे, कृषी विकास अधिकारी चोले, गटविकास अधिकारी महेश चव्हाण, विस्तार अधिकारी यू.एम. केंद्रे यांनी गंगापूर गावाला भेट देऊन गावकऱ्यांनी गावांत राबविलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
प्रारंभी सरपंच जयश्री बिरादार, उपसरपंच गणेश बिरादार, ग्रामसेवक भाग्यश्री आम्ले, माजी उपसरपंच सुधाकर बिरादार, मळकरे, शिवाजीराव बिरादार, किरण पाटील यांनी पथकातील अधिकाऱ्यांचे स्वागत केले. गावात स्मार्ट व्हिलेजसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. गंगापूर हे गाव सन २००६ साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात सर्वप्रथम आले होते. तंटामुक्त अभियान आणि स्मार्ट व्हिलेजमध्ये तालुक्यात सर्वप्रथम आले आहे. सूत्रसंचालन धनाजी भोसले यांनी तर आभार प्रदर्शन धोंडिराज बिरादार यांनी केले.