रस्त्याच्या कामासाठी मनपासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:30 IST2021-02-23T04:30:13+5:302021-02-23T04:30:13+5:30

लातूर : शहरातील प्रभाग क्र. १४ मधील कालिकादेवी मंदिराच्या बाजूस असलेल्या डाॅ. मोरे ते एकता रोड जुना औसा रोड ...

Sit in front of Manpas for road work | रस्त्याच्या कामासाठी मनपासमोर ठिय्या

रस्त्याच्या कामासाठी मनपासमोर ठिय्या

लातूर : शहरातील प्रभाग क्र. १४ मधील कालिकादेवी मंदिराच्या बाजूस असलेल्या डाॅ. मोरे ते एकता रोड जुना औसा रोड रस्त्याच्या कामासंदर्भात स्थानिक नागरिकांच्या वतीने १५ दिवसांपूर्वी मनपाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने नागरिकांच्या वतीने मनपासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

प्रभाग क्र. १४ मधील रस्त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. मनपाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी मनपाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नागनाथ श्रीनामे, रमेश गिरी, आदित्य शिंदे, प्रदीप शेलार, नीलेश कुलकर्णी, नरसिंग जाधव, शिवदास लोहारे, संतोष नाडे, जितेंद्र देशमुख, गोविंद कमठाणे, सुनील जोशी, लक्ष्मण काळे, नागनाथ शिराळे, रोहित गिरी, बजरंग गायकवाड, साजीद शेख उपस्थित होते.

Web Title: Sit in front of Manpas for road work