जिल्ह्यातील रुग्णालयांचा एकच कृती आराखडा तयार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST2021-04-17T04:18:40+5:302021-04-17T04:18:40+5:30
येथील कृषी व्यवसाय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला त्यांनी भेट दिली. तसेच चाकूर शहरासह तालुक्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. त्यावेळी ...

जिल्ह्यातील रुग्णालयांचा एकच कृती आराखडा तयार करावा
येथील कृषी व्यवसाय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरला त्यांनी भेट दिली. तसेच चाकूर शहरासह तालुक्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. एस. डी. जगदाळे, डॉ. श्रीहरी कुंभार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, सलीम तांबोळी, नीलेश देशमुख, सुनील दांडगे आदी उपस्थित होते.
संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा...
यावेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, चाकूर तालुक्यात रुग्ण तपासणी संख्या कमी असल्याने कोरोना चाचणीचा वेग सध्याच्या तुलनेत दहापट अधिक वाढवावा. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास मुभा आहे, अशा दुकानदारांची व तेथील कामगारांची कोरोना चाचणी करुन घेण्यात यावी. त्यात कोणी पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्यांना विलगीकरणात दाखल करण्यात यावे. ज्या गावांत २५पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना गृहविलगीकरणापेक्षा गावातील शाळा अथवा अन्य ठिकाणी विलगीकरणात ठेवून उपचार करावेत. संचारबंदीचे नियम कडकपणे पाळावेत. त्यात कोणत्याही प्रकारची कसर ठेवू नका, अशा सूचना त्यांनी पोलिसांना केल्या. परवानगी नसताना जे व्यापारी व्यवसाय करीत आहेत. तसेच संचारबंदीचे उल्लंघन करुन जे विनाकारण फिरत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही ते म्हणाले.