औसा येथे साधेपणाने महाशिवरात्रीचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:42+5:302021-03-13T04:35:42+5:30
श्री मुक्तेश्वर देवालय न्यासाच्या वतीने शिवभक्तांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करून दर्शन मंडपात १० ते १५ जणांना प्रवेश देण्यात येत होता. ...

औसा येथे साधेपणाने महाशिवरात्रीचा उत्सव
श्री मुक्तेश्वर देवालय न्यासाच्या वतीने शिवभक्तांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करून दर्शन मंडपात १० ते १५ जणांना प्रवेश देण्यात येत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यास मास्क अनिवार्य करण्यात आले होते. मंदिराचे पुजारी मुन्ना स्वामी यांच्या हस्ते महारुद्र अभिषेक, महापूजा आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. मंदिर समितीने मंदिर आणि शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.
गुरुवारी महाशिवरात्रीनिमित्त उंबडगा रोड येथील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिराकडे भाविकांची दिवसभर वर्दळ असली तरी प्रवेशद्वारापासून मास्क वापरणाऱ्यास प्रवेश देण्यात येत होता. फिजिकल डिस्टन्स राखण्यात येत होता. महाशिवरात्रीचा उपवास असल्याने दर्शनास येणाऱ्या भक्तांसाठी साबुदाण्याची खिचडी, केळी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती. महाशिवरात्रीची यात्रा आणि शुक्रवारचा पारंपरिक महाप्रसाद कार्यक्रम औशाच्या इतिहासात प्रथमच रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. शुक्रवारी महाप्रसाद होणार नाही, असे आवाहन श्री मुक्तेश्वर देवालय न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे.