सिकंदरपूर येथील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:54+5:302021-04-05T04:17:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘माझे गाव-माझी जबाबदारी’ अशी सामाजिक बांधीलकी जपत तालुक्यातील सिकंदरपूर येथील ...

सिकंदरपूर येथील
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘माझे गाव-माझी जबाबदारी’ अशी सामाजिक बांधीलकी जपत तालुक्यातील सिकंदरपूर येथील शिवभक्त मित्रमंडळ व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील ४५ वर्षांपुढील १२८ जणांचे कोविड लसीकरण करण्यात आले. उर्वरित नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजनही करण्यात आले.
हे लसीकरण गंगापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रताप इगे, डाॅ. चंद्रशेखर जाधव, आरोग्यसेविका के. डी. नरहरे, आरोग्यसेवक, एस. बी. पवार, आशा कार्यकर्ती मंगल बोकणे, नंदा बोयणे यांच्यासह गावातील शिवभक्त तरुण मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा माधव गंभिरे, उपसरपंच पिराजी ईटकर, पांडुरंग ताटे, राजकुमार अडसुळे, श्रीमंत गरगटे, दिगंबर कदम, तानाजी कोकाटे, सुरेश लष्कर, आदींनी परिश्रम घेतले.
पहिल्या टप्प्यात गावातील किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, ऑटोचालक, गुमास्ते अशा ५० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसेच उर्वरित व्यक्तींची टप्प्या-टप्प्याने चाचणी करून गाव कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला.
लसीकरणासाठी आरोग्य केंद्रापर्यंत मोफत वाहन सुविधा उपलब्ध करण्यात आली. स्वयंसेवक घरोघरी जाऊन लसीकरणासाठी नोंदणी करून घेत आहेत.