सिध्दी शुगरचे साडेपाच लाख मे. टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:15+5:302021-04-10T04:19:15+5:30
उजना येथील सिध्दी शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रिजने यंदाच्या गळीत हंगामात १५८ दिवसांत ५ लाख ४२ हजार ६९३ मे. टन ...

सिध्दी शुगरचे साडेपाच लाख मे. टन उसाचे गाळप
उजना येथील सिध्दी शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रिजने यंदाच्या गळीत हंगामात १५८ दिवसांत ५ लाख ४२ हजार ६९३ मे. टन उसाचे गाळप करून ५ लाख ३० हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा १०.५८ टक्के इतका मिळाला आहे.
यंदाच्या गळीत हंगामाची सांगता ६ एप्रिल रोजी कारखान्याचे मार्गदर्शक तथा माजी मंत्री बाळासाहेब जाधव, कारखान्याचे अध्यक्ष तथा आ. बाबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव, कारखान्याचे उपाध्यक्ष पी. जी. होनराव, जनरल मॅनेजर बी. के. कावलगुडेकर, जनरल मॅनेजर (केन) पी. एल. मिटकर, जनरल मॅनेजर (प्रोसेस) सी. व्ही. कुलकर्णी, ऊस पुरवठा अधिकारी पी. जे. भाकरे यांच्याहस्ते गव्हाण पूजन करून झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता समारंभ पार पडला. चालू हंगामात विक्रमी गाळप केल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांचे कौतुक केले. यावेळी ऊस तोडणी व ऊस वाहतुकीत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या वाहतूक ठेकेदार व तोड मुकादमांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अधिकारी, कर्मचारी व कामगारांना प्रोत्साहन म्हणून १२ दिवसांचे वेतन बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आले. तसेच डिस्टिलरीमध्ये बी हेवीपासून इथेनॉल उत्पादनही करण्यात आले.