शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भल्या पहाटे ट्रक आडवा लावून शोरूम फोडले; टीव्ही, फ्रीजसह ३५ लाखांचा मुद्देमाल लंपास

By राजकुमार जोंधळे | Updated: August 27, 2022 13:40 IST

चोरट्यानी हे शोरूम अतिशय शिताफीने फोडल्याचे समोर आले आहे.

लातूर : चोरट्यांनी शटर उचकटून शोरूम फोडल्याची घटना शनिवारी औसा रोडवर भल्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, शोरूमसमोर ट्रक उभा करून टीव्ही, फ्रीज आणि इतर साहित्य असा जवळपास ३० ते ३५ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. 

पोलिसांनी सांगितले, औसा रोड परिसरात एलजी कंपनीचे इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्याचे शोरूम आहे. दरम्यान, चोरट्यांच्या टोळीने शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश केला. समोर ट्रक उभा करण्यात आला. शोरूमधील टीव्ही, फ्रीज, कुलर, एलईडी, डिश असा जवळपास ३० ते ३५ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. दरम्यान, चोरट्यांनी शोरूममध्ये आणि बाहेर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, सीसीटीव्हीचा सेटच पळविला आहे. ही चोरी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, पहाटेच्या वेळी झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

घटनास्थळी लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे, सहायक पोलीस निरीक्षक राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जिल्हा विशेष शाखेच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

चोरीच्या साहित्याची मोजदाद सुरु...चोरट्यानी हे शोरूम अतिशय शिताफीने फोडल्याचे समोर आले आहे. साहित्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेरे, अख्खा सीसीटीव्हीचा सेटच पळविला आहे. चोरट्याची टोळी सराईत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

घटनास्थळी श्वानपथक दाखल...घटनास्थळी तातडीने श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, ठसे तज्ञालाही बोलवण्यात आले होते. हे दोन्ही पथक चोरट्याचा माग काढत आहेत. शिवाय, विविध पोलीस पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.

 

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी