रंगकर्मीतर्फे लघुपट महोत्सव; विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:13 IST2021-02-22T04:13:40+5:302021-02-22T04:13:40+5:30

अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील होते. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील-नागराळकर, अमोल कांडगिरे, अभिनेता संकेत कोर्लेकर, अभिनेत्री ...

Short Film Festival by Rangkarmi; Pride of individuals from various fields | रंगकर्मीतर्फे लघुपट महोत्सव; विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव

रंगकर्मीतर्फे लघुपट महोत्सव; विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव

अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील होते. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील-नागराळकर, अमोल कांडगिरे, अभिनेता संकेत कोर्लेकर, अभिनेत्री शिवकांता सुतार, चित्रपट महामंडळाचे सदस्य दत्ता जवळगे, शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, वैभव महाडिक, प्रवीण कुठार, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, रत्नाकर कांबळे, पत्रकार विनोद उगिले, पांडुरंग बिरादार, आदींची उपस्थिती होती.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील नेत्रगावकर यांना जीवन गौरव, तर माधव सावरगावे यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. तसेच भरत गायकवाड, हरी खोटे, शरद राठोड, सुमेध वाघमारे, हणमंत केंद्रे, विठ्ठल पांचाळ यांचा सत्कार झाला. साहित्य व शिक्षण क्षेत्रातील विलास सिंदगीकर, अंबादास केदार, सामाजिक : एन. आर. स्वामी, प्रा. प्रदीप वीरकपाळे, वैद्यकीय : डॉ. प्रशांत नवटक्के, पोलीस श्रीकांत देशपांडे, कला : प्रकाश घादगीने, सृष्टी जगताप, शिक्षण : संगीता कासार, राजाराम माने, आलोक बारकुटे, रामेश्वर पटवारी, अनिता यलमटे, राजम्मा मळभागे, नीता मोरे, अर्चना पाटील, सिद्धप्पा शिंदे, संध्या कुलकर्णी, दीपाली कुलकर्णी, सलीम अत्तार, कोरोना योद्धा : डॉ. धनाजी कुमठेकर, डॉ. शशिकांत देशपांडे, डॉ. मेघश्याम कुलकर्णी, डॉ. हरेश्वर सुळे, डॉ. विशाल पाटील, डॉ. अजित पाटील, डॉ. सुहैब शेख, डॉ. श्रीकांत शेळकीकर. शिक्षक : बाबाराव पाटील, रमेश सातपुते, व्यंकट आलट, तुळशीराम पळनाटे, हनमंत घोडके, मल्लिकार्जुन ममदापुरे, विश्वंभर गव्हाणे, संभाजी कोयले, शिवरुद्र पाटील, ज्ञानेश्वर धोंडिराम, राहुल गुरमे, दिलीप हनमंते, प्रशांत पाटील, महेश हुलसुरे, दत्तकुमार स्वामी, महेश पाटोदकर, मुरलीधर रघुनाथ गवळी, विनोद उगिले, संतोष कोटलवार, माधव घोणे, गजानन बंडेवार, गोविंदराव सावरगाव, बालाजी मुंढे, ज्ञानोबा मोरतळे, अतुल गुरमे, लघुपट महोत्सव बेस्ट शॉर्ट फिल्म : प्रथम रेड, द्वितीय जर्नी ऑफ स्कूल बॅग, बेस्ट डायरेक्शन : प्रथम सुमीत पाटील, द्वितीय जय भोसले, बेस्ट सिनेमाटॉग्राफक : प्रथम आर. विष्णू , द्वितीय सतीश अंबेकर, बेस्ट स्टोरी ॲण्ड डायलॉग्स : डॉ. रुधा करपे, अश्विन सालसकर, बेस्ट ॲक्टर मेल : सिद्धेश्वर वाघमारे, शेखर रणखांबे, बेस्ट ॲक्टर फिमेल : सायली बांगडीर, ऋतुजा बागवे, बेस्ट चाईल्ड ॲक्टर : जर्नी ऑफ स्कूल बॅग, रुद्रा बंडागीले, आदींचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ॲड. महेश मळगे यांनी प्रास्ताविक केले, तर रसूल पठाण व अर्चना पाटील यांनी सूत्रसंचालन केले.प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या सचिव ज्योतीताई मद्देवाड, अनमोल कवडेकर, सिद्धार्थ सूर्यवंशी, मारोती भोसले, सचिन शिवशेट्टे, प्रा. रामदास केदार, लक्ष्मण बेंबडे, विष्णू कवडेकर, ॲड. लांडगे, आदींनी पुुढाकार घेतला.

Web Title: Short Film Festival by Rangkarmi; Pride of individuals from various fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.