शनिवारपासून व्यापारी सुरू करणार दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:35+5:302021-05-14T04:19:35+5:30
लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देऊन व्यथा मांडली. कोरोना महामारीच्या मागच्या ...

शनिवारपासून व्यापारी सुरू करणार दुकाने
लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देऊन व्यथा मांडली. कोरोना महामारीच्या मागच्या एक वर्षाच्या काळात जिल्हा
प्रशासनास व्यापारी, उद्योजक, लघु व्यावसायिक या सर्वांनी आपआपल्या आस्थापना बंद ठेवून सहकार्य केलेले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून व्यवसाय, दुकाने बंद ठेवावी लागल्याने व्यापारी व उद्योजक वर्गाचा
आर्थिक कणा मोडला आहे. परिणामी अनेक व्यापाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला आहे. दुकान भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार,लाईट बिल, घर खर्च, औषधोपचाराचा खर्च वाढल्याने आर्थिक संतुलन बिघडलेल्या व्यापाऱ्यांचे आता मानसिक संतुलनही बिघडले आहे. अनेक व्यापारी परिवारात दुःखद घटना घडल्या आहेत. व्यापारी, उद्योजकांचा जगण्याचा मार्गच बंद झाला आहे.त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने १५ मे पासून कोरोनाच्या सर्व नियम, निर्बंधांचे पालन करून व्यवसाय सुरु करण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीकडे सहानुभुतीने विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे महासंघाने सांगितले.
शिष्टमंडळात व्यापारी महासंघाचे सचिव मनिष बंडेवार, उपाध्यक्ष विश्वनाथ किणीकर, कोषाध्यक्ष विनोद गिल्डा, रामदास भोसले, आतिष अग्रवाल,भारत माळवदकर, राघवेंद्र इटकर, दत्तात्रेय पत्रावळे, चंदू बलदवा, गोविंद चेटवानी,कमलेश पाटणकर, फुटवेअर असोसिएनचे अध्यक्ष मुस्तफा शेख,यांचा समावेश होता.