शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

धक्कादायक! लातूर ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला पोलिस हवालदार, 17 कोटींचा माल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 19:49 IST

शेतात उभारला ड्रग्स बनवण्याचा कारखाना; पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या.

लातूर: चाकूर तालुक्यातील रोहिणी शिवारात ड्रग्जचा कारखाना उभारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कारखान्यावर धाड टाकून पोलिसांनी 11 किलो ड्रग्स जप्त केले. या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात 17 कोटी रुपये किंमत असल्याचे बोलले जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी मुख्य आरोपी मुंबई पोलिस दलातील कर्मचारी आहे. प्रमोद केंद्रे, असे त्याचे नाव असून, तो आपल्या साथीदारांच्या मदतीने मुंबईतच या ड्रग्सची विक्री करत असे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्यावेळी त्याची मुंबईतल्याच एका ड्रग्ज तस्कराशी ओळख झाली आणि त्यानेच केंद्रेला ड्रग्ज तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. यानंतर काही महिन्यांपूर्वीच केंद्रेने आपल्या गावाकडे माळरानावर शेड बांधले आणि त्यात ड्रग्जचे उत्पादन सुरू केले. तो मुंबईतून कच्चा माल आणायचा आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने शेतात ड्रग्स तयार करायचा.

या ड्रग्ज निर्मितीतून आरोपींनी बराच पैसा कमावला. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्ज तस्कराला अटक केली होती. त्यानेच चौकशीत प्रमोद केंद्रेच्या कारखान्याची माहिती दिली. पुणे येथील पथक रोहिणा परिसरात गेले आणि त्यांनी या कारखान्यावर धाड टाकली. या धाडीत त्यांना कोट्यवधी रुपयांचा 11 किलो कच्चा माल हाती लागला. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींनाही अटक केली आहे. 

आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीयाप्रकरणी प्रमोद संजीव केंद्रे (वय 35 रा. रोहिणी ता. चाकूर), महमद कलीम शेख (रा. गोळीबार रोड, मुंबई), जुबेर हसन मापकर (52 रा. रोहा जि. रायगड), आहाद मेमन (रा. डोंगरी, मुंबई), अहमद अस्लम खान (रा. मुंबई) यांना चाकूर न्यायालयात बुधवारी हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली.

टॅग्स :laturलातूरDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस