धक्कादायक ! दिवसभरात बाधितांचा आकडा ७०७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:23+5:302021-04-02T04:19:23+5:30
पॉझिटिव्हिटी रेट ३०.२ टक्क्यांवर प्रयोगशाळेत १,००५ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ३०४ रुग्ण आढळले असून, त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३०.२ ...

धक्कादायक ! दिवसभरात बाधितांचा आकडा ७०७
पॉझिटिव्हिटी रेट ३०.२ टक्क्यांवर
प्रयोगशाळेत १,००५ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ३०४ रुग्ण आढळले असून, त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३०.२ टक्के आहे. रॅपिड अँटीजेन टेस्ट २,०३९ जणांची करण्यात आली. त्यात ४०३ रुग्ण बाधित आढळले आहेत. या टेस्टचा पॉझिटिव्हिटी रेट १९.८ टक्के आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. दररोजचा धक्कादायक अहवाल समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगायला हवी. फिजिकल डिस्टन्स, मास्क आणि वारंवार हात धुणे आवश्यक आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. विनाकारण गर्दीत जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
२३७ जणांची कोरोनावर मात
प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून २३७ जणांना सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील २०० जणांचा समावेश आहे. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ५, सामान्य रुग्णालय उदगीर येथील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील १३, तोंडार पाटी कोविड केअर सेंटरमधील २ असे एकूण २३७ जणांनी कोरोनावर मात केली.