धक्कादायक ! एकाच दिवशी आढळले १ हजार ४०४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:48+5:302021-04-10T04:19:48+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत २२०० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४३२ रुग्ण आढळले आहेत तर ३६५० रॅपिड ...

धक्कादायक ! एकाच दिवशी आढळले १ हजार ४०४ रुग्ण
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत २२०० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४३२ रुग्ण आढळले आहेत तर ३६५० रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यात ९७२ रुग्ण आढळले. रॅपिड आणि प्रयोगशाळेत मिळून ५८५० चाचण्या करण्यात आल्या. त्यात एकूण १ हजार ४०४ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, बाधित असलेल्या ८३२४ रुग्णांपैकी १५६ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत तर ३४ रुग्ण गंभीर व्हेंटिलेटरवर आहेत. ४१ रुग्ण गंभीर बीआयएपी व्हेंटिलेटरवर असून, ४९१ रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत तर ४१० रुग्ण मध्यम परंतु, विना ऑक्सिजनची आहेत तर ७ हजार ३४० रुग्ण सौम्य लक्षणाची आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली. प्रयोगशाळेतील चाचणीचा पॉझिटिव्हिटी रेट १९.६ टक्के तर रॅपिड अँटिजन टेस्टमधील पॉझिटिव्हिटी रेट २६.६ टक्के आहे. दरम्यान, आतापर्यंत ३ लाख ३७ हजार ६४ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४० हजार ५३१ बाधित आढळले. त्यातील पॉझिटिव्हिटी रेट १२ टक्के आहे.
५२२ जणांना सुटी
शुक्रवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ५२२ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुटी मिळालेल्या रुग्णांमध्ये होम आयसोलेशनमधील ४२८ जणांचा समावेश आहे. मरशिवणी कोविड केअर सेंटर येथील २०, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ३२, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेतील २, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ३, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील २९ आणि खासगी रुग्णालयातील ८ असे ५२२ जण कोरोनामुक्त झाले.