शिवसुरक्षा अभियानाने शिवसप्ताहास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST2021-02-14T04:19:08+5:302021-02-14T04:19:08+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी अभिजीत देशमुख, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ...

शिवसुरक्षा अभियानाने शिवसप्ताहास प्रारंभ
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी अभिजीत देशमुख, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन राऊत, सचिव ॲड. शिवकुमार जाधव, वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश बंकावाड, ॲड. उदय गवारे, अजय शहा, प्रमोद साळुंके, वैजनाथ जाधव, केदार पाटील, किसन कदम यांची उपस्थिती होती. अभिजीत देशमुख म्हणाले, जिल्ह्यात ऊस वाहतुक करणारी वाहने मोठया संख्येत आहेत. तथापि यातील बऱ्याच वाहनांना रेडीयम टेप नसल्याने अपघात होतात. छत्रपती शिवरायांचा विचार जयंती पुरता न ठेवता तो नित्याने जगावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पोलीस निरीक्षक बंकावाड यांनी देशात प्रतिवर्षी साडेचार लाख रस्ते अपघात होतात व त्यात दीड लाख नागरीकांचा जीव जातो. हे प्रमाण कोरोनाबाधेने मरण पावणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक असल्याचे सांगत कोरोनाबाबत जशी काळजी घेतली जाते तशी वाहतुक सुरक्षेप्रति घेतली पाहिजे, असे आवाहन केले.