अहमदपूर येथे शिवनाम सप्ताह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST2021-09-14T04:24:03+5:302021-09-14T04:24:03+5:30

उत्सवात दैनंदिन कार्यक्रमामध्ये गुरुवर्य समाधी रुद्राभिषेक, परमरहस्य पारायण, महाप्रसाद, गाथा भजन, दुपारी कीर्तन, सायंकाळ शिवपाठ, शिव कीर्तन व ...

Shivnam Week Ceremony at Ahmedpur | अहमदपूर येथे शिवनाम सप्ताह सोहळा

अहमदपूर येथे शिवनाम सप्ताह सोहळा

उत्सवात दैनंदिन कार्यक्रमामध्ये गुरुवर्य समाधी रुद्राभिषेक, परमरहस्य पारायण, महाप्रसाद, गाथा भजन, दुपारी कीर्तन, सायंकाळ शिवपाठ, शिव कीर्तन व शिवजागर होणार आहे. या सप्ताहाची सुरुवात १५ सप्टेंबर रोजी होणार असून, या दिवशी सकाळी ९ वाजता पंचक कलश पूजन, वीणा पूजन, परमरहस्य ग्रंथ पूजन होणार आहे. या सर्व कार्यक्रमास कोविड नियमांचे पालन करून भक्तिस्थळावर भाविक, भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रसंत सद्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यात शिवनाम सप्ताहनिमित्त भजन, कीर्तन, व्याख्यान, शिवपाठ, सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण कार्यक्रम १५ ते २० सप्टेंबरपर्यंत होणार आहेत. या कार्यक्रमासांठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलगंणा राज्यांचे भाविक, भक्त उपस्थित राहणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Web Title: Shivnam Week Ceremony at Ahmedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.