केंद्र सरकारच्या विरोधात शिवलीत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:58+5:302020-12-05T04:32:58+5:30
... धानोरा- मोटेगाव रस्ता दुरुस्त करावा रेणापूर : मोटेगाव ते धानाेरा हा रस्ता अति पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे या ...

केंद्र सरकारच्या विरोधात शिवलीत निदर्शने
...
धानोरा- मोटेगाव रस्ता दुरुस्त करावा
रेणापूर : मोटेगाव ते धानाेरा हा रस्ता अति पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आ. धीरज देशमुख यांच्याकडे रेणुका तालुका खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष माणिक सोमवंशी यांच्यासह मोटेगावच्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. मोटेगाव- धानोरा रस्त्याचे काम दहा वर्षांपासून झाले नाही. त्यातच अतिवृष्टी झाल्याने हा रस्ता वाहून गेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
...
पाणंद रस्त्याचे काम करण्याची मागणी
रेणापूर : तालुक्यातील मोटेगाव येथील दोन पाणंद रस्त्याचे काम मग्रारोहयोअंतर्गत करण्यात यावी, अशी मागणी गावातील शेतक-यांनी केली आहे. या मागणीचा प्रस्तावही तहसील कार्याकडे सादर करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही पाणंद रस्त्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळ्यात शेतक-यांना शेतीकडे ये- जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल होत असल्याने शेतक-याची कसरत होत आहे.
...
सुधारित वाणाचे शेतक-यांना प्रशिक्षण
औसा : लातुरातील मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कडधान्य पीक प्रात्यक्षिकअंतर्गत तालुक्यातील भादा येथील निवडक प्रयोगशील शेतक-यांच्या ४० एकर प्रक्षेत्रावर तुरीच्या सुधारित वाणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी कृषी विद्यातज्ज्ञ पी.डी. मताई, एस.बी. देशमुख, एस.बी. केंद्रे, प्रयोगशील शेतकरी रामेश्वर माळी यांची उपस्थिती होती. यावेळी सुधारित वाणाची माहिती देण्यात येऊन खत व पाणी व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.