शिवजयंती उत्साहातच साजरी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST2021-02-14T04:19:04+5:302021-02-14T04:19:04+5:30
शिवजयंती शंभर लोकांच्या उपस्थितीत पार पाडावी, असा शासनादेश राज्य सरकारने काढला आहे. या आदेशावर संताप व्यक्त करीत फेसबुक लाईव्हवर ...

शिवजयंती उत्साहातच साजरी करणार
शिवजयंती शंभर लोकांच्या उपस्थितीत पार पाडावी, असा शासनादेश राज्य सरकारने काढला आहे. या आदेशावर संताप व्यक्त करीत फेसबुक लाईव्हवर माजी मंत्री आ. संभाजी पाटील म्हणाले, दरवर्षी जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विविध उपक्रम घेतले जातात. यापूर्वी आम्ही लातूरच्या क्रीडा संकुलावर दोन एकर जागेत छत्रपती शिवरायांची रांगोळी रेखाटली होती. दुस-या वर्षी हरित शिवजयंती साजरी करताना पाच एकरमध्ये वृक्षांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारली होती. गेल्या वर्षी १२ बलुतेदारांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक केला होता. याही वर्षी संगीतकार व गायक अवधूत गुप्ते यांच्या शिवगर्जना या संगीत रजनीचा आणि भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाचे आयोजन केले आहे. मात्र राज्य शासनाने आदेश काढल्यामुळे शिवभक्तांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शिवभक्तांनी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात परंपरेनुसार शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन आ. निलंगेकरांनी केले आहे.
शिवभक्तांच्या आपण पाठिशी खंबीर...
शिवजयंती साजरी करताना कोणी अडवणूक केल्यास त्याला उत्तर देण्यास मी खंबीर आहे. शासनाला कारवाई करायची असेल तर ती प्रथम माझ्यावर करावी. शिवभक्तांच्या पाठिशी आपण खंबीरपणे असल्याचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.