जळकोटात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:55 IST2021-02-20T04:55:28+5:302021-02-20T04:55:28+5:30

बाजार समितीचे सभापती मन्मथअप्पा किडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, राष्ट्रवादीचे ...

Shiva Jayanti celebrated with various activities in Jalkot | जळकोटात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

जळकोटात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी

बाजार समितीचे सभापती मन्मथअप्पा किडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधव मुक्रम बंडे यांनी आपल्या कुटुंबीयांसह छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली.

यावेळी जि.प.चे गटनेते संतोष तिडके, पं. स. चे सभापती बालाजी ताकबिडे, माजी जि. प. सदस्य चंदन पाटील, माजी नगराध्यक्ष किसन धुळशेटे, सोसायटीचे चेअरमन अशोक डांगे, बाजार समितीचे सदस्य बाबूराव जाधव, नगरसेवक महेश धुळशेट्टे, शिवानंद देशमुख, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, किरण पवार, ॲड. तात्या पाटील, ॲड. श्रीनिवास मंगनाळे, गोपाळकृष्ण गबाळे, दिगंबर भोसले, गोविंद मंगनाळे, गोविंद भ्रमण्णा, प्राचार्य संपत शिंगाडे, सोमेश्वर सोप्पा, डॉ. चंद्रकांत काळे, व्यंकटराव पवार, राजकुमार मंगनाळे, सचिन भोसले, माणिक शिंदे आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन चंद्रशेखर कळसे यांनी केले. तर गोविंद मंगनाळे यांनी आभार मानले.

Web Title: Shiva Jayanti celebrated with various activities in Jalkot