शिवसेना कार्यकर्ता मेळावा शिरूर अनंतपाळ येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. मंचावर महिला जिल्हा संघटक डॉ. शोभा बेंजरगे, जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक, लिंबन महाराज रेशमे, विश्वनाथ स्वामी, पप्पू कुलकर्णी, शिवाजी माने, विनोद आर्य, सुनीता चाळक, अविनाश रेशमे, सतीश शिंदे, बाबूराव शेळके, सोमनाथ स्वामी, भागवत वंगे, सतीश शिवणे यांची उपस्थिती होती. यावेळी माजी खा. खैरे म्हणाले, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार जोमाने काम करत असून, मुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागाच्या विकासाची तळमळ आहे. त्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्याचा अपेक्षित विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता येण्यासाठी शिवसैनिकांनी परिश्रम करावे असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन भागवत वंगे यांनी केले. मेळाव्यासाठी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
शिरूर अनंतपाळच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST