शिरूर ताजबंद शिवारातील उभा उस आगीच्या भक्षस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:36 IST2021-03-04T04:36:14+5:302021-03-04T04:36:14+5:30
अहमदपूर तालुक्यातील थाेरलीवाडी येथील सुधाकर तुकाराम फुलमंटे, सचिन प्रकाश वलसे, शिरुर ताजबंद येथील पद्मीनबाई ज्ञानोबा वाढवणकर, अरविंद तुकाराम फुलमंटे, ...

शिरूर ताजबंद शिवारातील उभा उस आगीच्या भक्षस्थानी
अहमदपूर तालुक्यातील थाेरलीवाडी येथील सुधाकर तुकाराम फुलमंटे, सचिन प्रकाश वलसे, शिरुर ताजबंद येथील पद्मीनबाई ज्ञानोबा वाढवणकर, अरविंद तुकाराम फुलमंटे, गाेविंद व्यंकट वलसे यांची शेती आहे. यांच्या शेतात उभा असलेल्या उसाला बुधवारी दुपारी दाेन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लगली. या आगीत उभा उस जळून खाक झाला आहे. काही कळायच्या आत आगीने राैद्र रुप धारण केले. यावेळी विक्रमराजे भाेसले यांनी तातडीने अहमदपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. काही वेळात सदरचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. शेजारी असलेल्या दैवशाला अशोक फुलमंटे आणि बालाजी दिलीप वलसे या शेतकऱ्यांच्या ड्रीपच्या नळ्या आणि स्प्रिंकलरचे पाईप जळून खाक झाले आहेत. शिरुर ताजबंद येथील तलाठी नवनीत जामनिक यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते मंचकराव पाटील, सुरज पाटील, दत्ताभाऊ जवळगे, उध्दव भोसले यांची उपस्थिती हाेती.