निबंध स्पर्धेत शारदा स्कूलचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:47+5:302021-07-19T04:14:47+5:30
वसुंधरा प्रतिष्ठानचा वृक्ष हेल्पलाईन उपक्रम लातूर : वृक्ष लागवड अन् संवर्धनाबाबत मोफत माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने वसुंधरा परिवाराच्यावतीने ...

निबंध स्पर्धेत शारदा स्कूलचे यश
वसुंधरा प्रतिष्ठानचा वृक्ष हेल्पलाईन उपक्रम
लातूर : वृक्ष लागवड अन् संवर्धनाबाबत मोफत माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने वसुंधरा परिवाराच्यावतीने वृक्ष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. वनक्षेत्र वाढविण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी केले. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, रवींद्रनाथ महाराज, बसवराज स्वामी, उमाकांत मुंडलीक, रामेश्वर बावळे, अध्यक्ष ॲड. अजित चिखलीकर, अमोल स्वामी, हुसेन शेख, राहुल माशाळकर, शिवाजी निरमनाळे, दत्ता जाधव, विशाल वळसने, प्रसाद कुंभार, प्रवीण कुंभार, प्रसाद कोळी, राहुल पाटील, आदींची उपस्थित होते.
कामगार आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप
लातूर : भाजप कामगार आघाडीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव पाटील आणि भाजप महिला अल्पसंख्याकच्या प्रदेशाध्यक्ष संध्या जैन यांच्या हस्ते भाजप कामगार आघाडी, लातूरच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ज्योतिराम चिवडे, रामचंद्र जाधव, रणजित सूर्यवंशी, रामेश्वर फुटाणे, स्वास्तिक बाहेती, सुभाष सगर, सचिन हिरेमठ, ओमप्रकाश अग्रवाल, चंद्रकांत बंडगर, महादेव झुंजे, नागनाथ स्वामी, सतीश बरीदे, सुजित राऊत, गजानन भालेराव, संतोष सोनी, दर्शन घाडगे, सोमेश कोरे, आदी उपस्थित होते.
स्वामी दयानंद विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
लातूर : कव्हा येथील स्वामी दयानंद विद्यालयात दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत पाटील, वेदिका वंटेकर, काजल जागले, शहजाद शेख, सानिया शेख, नाजीया शेख, देवकन्या बोयणे, मुस्कान सय्यद, अविनाश माने, अंकिता इर्ले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षक, पालक उपस्थित होते. सर्व गुणवंताचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रतिभाताई पाटील कव्हेकर, अजितसिंह पाटील कव्हेकर, रणजितसिंह पाटील कव्हेकर, नीळकंठराव पवार, मुख्याध्यापिका अरुणा कांदे, उपमुख्याध्यापक देशमुख, कदम आदींनी कौतुक केले आहे.
भारत विकास परिषदेतर्फे वृक्षारोपण
लातूर : भारत विकास परिषदेच्यावतीने मियावाकी पध्दतीने एक एकरमध्ये सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. औसा तालुक्यातील शिवली येथे भारत विकास परिषद व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प राबविण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पडिले, जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, सरपंच खडके, श्रीकिरण दंडे, योगेश काळे, सारंग आयचीत, सुधाकर जोशी, अमित कुलकर्णी, लिंबराज माने, परिषेदेचे उपाध्यक्ष विजयराव जाधव, विजय जाधव, लिंबराज माने आदी उपस्थित होते.