सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:20 IST2021-01-25T04:20:16+5:302021-01-25T04:20:16+5:30
तालुक्यातील निटूर येथील ग्रामपंचायतीची पाहणी करून विकासकामांची माहिती घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, ...

सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज
तालुक्यातील निटूर येथील ग्रामपंचायतीची पाहणी करून विकासकामांची माहिती घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, शाखा अभियंता अघोर, उद्धव फड, चांगदेव डोपे, उपसरपंच संगमेश्वर करंजे, आरोग्य अधिकारी मोरे, अंकुश बिराजदार, राजकुमार चव्हाण, दत्ता कवडे, शिवराज सोमवंशी, आदी उपस्थित होते.
यावेळी सीईओ गोयल म्हणाले, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निघणारा घनकचरा व त्याची विल्हेवाट ही एक मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. कोरोनाच्या संकटाच्या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.