सातबारा संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST2021-07-27T04:20:56+5:302021-07-27T04:20:56+5:30

देवणी : महसूल विभागाच्यावतीने तालुक्यात सुरू असलेले सातबारा संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवडाभरात सातबारा संगणकीकरणाचे काम ...

Seventeen computerization work in final stage | सातबारा संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

सातबारा संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

देवणी : महसूल विभागाच्यावतीने तालुक्यात सुरू असलेले सातबारा संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवडाभरात सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली.

तालुक्यात अनेक दिवसांपासून सातबारा संगणकीकरणाचे काम सुरू आहे. हस्तलिखित व संगणकीकरण सातबाऱ्यात अचूकता आणण्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल. एक टक्का राहिलेले काम हे क्लिष्ट असून, सातबारा जुळविण्यासाठी लागवडीयोग्य क्षेत्र व खातेदारांचे क्षेत्र यांचा ताळमेळ जुळणे, सातबाराचे क्षेत्र गाव नमुना नंबर १ शी जुळणे आवश्यक असते. सोप्या प्रकरणात एकतर्फी कारवाई केली जाते. परंतु, जिथे खातेदाराच्या हितावर परिणाम होईल, तिथे खातेदारांनी मोजणी अर्ज करणे आवश्यक आहे. परंतु, खातेदार अर्ज करत नसल्यामुळे काम प्रलंबित आहे.

तालुक्यात केवळ १४ सातबाऱ्यांचे काम शिल्लक राहिले आहे. सर्व तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांकडून हे काम सुरू आहे. सातबारा संगणकीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ज्या शेतकऱ्यांच्या सातबारामधील क्षेत्र कमी-जास्त आहे, त्यांनी जर तातडीने संपर्क साधला तर आठ दिवसांत हे काम पूर्ण होऊ शकते, अशी माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी दिली.

Web Title: Seventeen computerization work in final stage