८ हजार ६२५ कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका अद्ययावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST2021-03-29T04:13:40+5:302021-03-29T04:13:40+5:30

जिल्हा परिषदेत २८ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा ...

Service book of 8 thousand 625 employees updated | ८ हजार ६२५ कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका अद्ययावत

८ हजार ६२५ कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका अद्ययावत

जिल्हा परिषदेत २८ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमध्ये कार्यालयीन स्वच्छता करण्यासाठी वेळापत्रक ठरवून देण्यात येऊन स्वच्छता करून घेण्यात आली. सर्व ३६१ कार्यासनाचे दप्तर सहा गठ्ठा पद्धतीने ठेवले गेले. सामान्य प्रशासन विभागामध्ये एकूण १६३ स्थायी आदेश संचिका अद्ययावतीकरण करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदअंतर्गत एकूण ५० हजार ५०० अभिलेख्याचे निर्लेखन करण्यात आले. निर्लेखन करण्यात आलेल्या अभिलेख्याचे वजन सुमारे १८.५ टन एवढे होते. या निर्लेखनातून १ लाख ६६ हजार ६८३ रुपयांचे उत्पन्न जिल्हा परिषदेस मिळाले आहे.

जिल्हा परिषदेमधील ५४ संवर्गाच्या सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून ८ हजार ६५८ पैकी ८ हजार ६२५ कर्मचाऱ्यांच्या प्रथम व दुय्यम सेवापुस्तिका अद्ययावत करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या पात्र असलेल्या २५६ कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. तसेच सर्व संवर्गातील पदोन्नतीच्या माहे ऑगस्ट २०२१ अखेर रिक्त पदावर निवड केली असून ८ हजार ६५८ अधिकारी- कर्मचाऱ्यांपैकी ८ हजार २६९ अधिकारी- कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल प्रतिवेदन व पुनर्विलोकन करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषदअंतर्गत अभिलेख जतन करून ठेवण्यासाठी ५० रॅक तयार करण्यात आले आहेत.

सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आणि सभापतींच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांनी दिली.

Web Title: Service book of 8 thousand 625 employees updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.