शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात झाली जन्मठेपेची शिक्षा; जामिन भेटताच लातूरला येताना घेऊन आला पिस्टल

By राजकुमार जोंधळे | Updated: June 17, 2024 19:29 IST

पोलिसांनी तरुणाकडून जिवंत काडतूस, मॅगझिन जप्त

लातूर : पिस्टल, दाेन जिवंत काडतूस आणि मॅगझिनसह एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साेमवारी अटक केली. आठवड्यात केलेली शस्त्र जप्तीची ही कारवाई दुसरी आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे साेमवारी औसा-तुळजापूर महामार्गावरील चिंचोली येथे पाण्याच्या टाकीनजीक थांबलेल्या एकाला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेऊन चौकशी केली असता, महेश दिनकर कुलकर्णी (वय ३०, रा. टाका, ता. औसा) असे त्याने नाव सांगितले. त्याच्याकडून एक पिस्टल, दाेन जिवंत काडतुसे आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, पोउपनि. संजय भोसले, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, मोहन सुरवसे, योगेश गायकवाड, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली आहे.

पुण्यात झाली जन्मठेप; गावी आल्यावर अटक...पाेलिसांनी अटक केलेला महेश दिनकर कुलकर्णी हा सध्या पुणे शहरात वास्तव्याला आहे. त्याच्याविराेधात सिंहगड रोड, पुणे पाेलिस ठाण्यात गुरनं. ०५/२०१५ कलम ३०२ भादंविसह, ४/२५ शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल असून, यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सध्या तो जामिनावर बाहेर असून, गावाकडे आला हाेता. यावेळी लातूर पाेलिसांनी त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर