हरंगुळ, नागझरी, साई योजनांचा एकत्र प्रस्ताव पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:49+5:302021-02-05T06:25:49+5:30
नागझरी येथे जाऊन पाणीपुरवठा योजनेच्या पंपाची तसेच उच्च पातळी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेलिंग बसविण्याच्या सूचना केल्या. नागोबा ...

हरंगुळ, नागझरी, साई योजनांचा एकत्र प्रस्ताव पाठवा
नागझरी येथे जाऊन पाणीपुरवठा योजनेच्या पंपाची तसेच उच्च पातळी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेलिंग बसविण्याच्या सूचना केल्या. नागोबा मंदिराचे सुशोभिकरण करून बोटिंग सुविधा निर्माण कराव्यात, असे प्रशासनाला सुचित केले. नदीपात्रातील विहिरी, पर्यटनस्थळाच्या नियोजित जागांचीही पाहणी करण्यात आली. लातूरहून येताना पर्यटकांची वाहतूक व्यवस्था, साई ते ममदापूर दरम्यान बोटिंग सुविधा निर्माण करणे, या अनुषंगानेही सूचना करण्यात आल्या.
यावेळी नागझरी व साई ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री अमित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा आयुक्त अमन मित्तल, विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, व्यंकटेश पुरी, प्रमोद जोशी, सुंदर पाटील कव्हेकर, पाणीपुरवठा शाखा अभियंता यु.एच. शिंदे, विजय चोळखणे, एस.एन. कलवले, बी.बी. थोरात, यु.डी. स्वामी, ए.एस. पिसाळ आदींची उपस्थिती होती.