महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:18 IST2021-03-18T04:18:50+5:302021-03-18T04:18:50+5:30

अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक शि.वै. खानापुरे यांची उपस्थिती असून, चर्चासत्राचे उद्घाटन युवा नेते शैलेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे. ...

Seminar organized at Mahatma Basaveshwar College | महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन

अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक शि.वै. खानापुरे यांची उपस्थिती असून, चर्चासत्राचे उद्घाटन युवा नेते शैलेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे. चर्चासत्रामध्ये माजी कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे, डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. एम. एस. दडगे यांचे मार्गदर्शन होणार आहे.

सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. बाळासाहेब गोडबोले,डॉ. रत्नाकर बेडगे, डाॅ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. संजय गवई आदींनी केले आहे.

चारचाकीच्या धडकेत एकजण जखमी

लातूर : शहरातील गुळ मार्केट ते गांधी चौक जाणाऱ्या राेडवर बीएसएनएल ऑफिसजवळ चारचाकी क्रमांक एमएच २४ एएस. ७०६८ ने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवून फिर्यादीच्या आईस जोराची धडक दिली. या अपघातात फिर्यादी महादेव श्रीमंत मरे यांच्या आई गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी महादेव मरे यांच्या तक्रारीवरुन चारचाकी क्र. एमएच २४ ए.एस ७०६८ च्या चालकाविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पवार करीत आहेत.

पैसे देण्याच्या कारणावरुन मारहाण

लातूर : तालुक्यातील सोनवती येथे संगनमत करुन पैसे देण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. याप्रकरणी लातूर ग्रामीण गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी सांगितले, फिर्यादी आलीस लायक शेख यास पैसे देण्याच्या कारणावरुन मारहाण करण्यात आली. याबाबत आलीस शेख यांच्या तक्रारीवरुन तानाजी संतोष जाधव व सोबत असलेल्या दोघांविरुद्ध लातूर ग्रामीण पोलिसात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चेरले करीत आहे.

पठाणवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह

लातूर : पठाणवाडी परिसरातील बेलेश्‍वर मठ संस्थानच्या महादेव मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह पार पडला.. पाथरी मठ संस्थानचे काशिनाथ बापू शिवाचार्य महाराज, श्री शिवयोगी अनंत महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. सप्ताहात ह.भ.प. मारुती महाराज हरंगुळकर, शंकर देशमुख महाराज, राजकुमार महाराज हरंगुळकर, शिवमूर्ती महाराज हरंगुळकर आदींची कीर्तने झाली. यशस्वीतेसाठी व्यंकट पन्हाळे, रामभाऊ वडगावे, शिवमूर्ती स्वामी, सोमवंशी, पाखर सांगवीचे ग्रामस्थ तथा सरपंच राजाभाऊ लखादिवे, त्र्यंबक चव्हाण, काशिनाथ गुरव, दगडू हंडरगुळे, उमेश हंडरगुळे, याडबा पवार आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Web Title: Seminar organized at Mahatma Basaveshwar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.