शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

खेड्या-पाड्यात १० हजारात चोरीच्या दुचाकींची विक्री; दाेघांना पाेलिस पथकाने उचलले !

By राजकुमार जोंधळे | Updated: May 6, 2023 18:55 IST

दुचाकी चाेरट्यांचा धुमाकूळ : दोघांकडून सात दुचाकी जप्त

लातूर : शहरासह जिल्ह्यात विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी, तीनचाकीसह चारचाकी वाहने पळविण्याच्या घटनांमध्ये अलीकडे माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दुचाकी चाेरणाऱ्या आणि त्याची दहा ते पंधरा हजारांत विल्हेवाट लावणाऱ्या टाेळीतील दाेघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दाेघेही औसा तालुक्यातील असल्याची माहिती समाेर आली असून, त्यांच्याकडून आतापर्यंत सात दुचाकी जप्त केल्या आहेत.

लातूर शहरातील शाळा-महाविद्यालय, क्लासेस परिसर आणि बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी पार्किंग केलेल्या दुचाकींवर या टाेळीची विशेष नजर आहे. वाहनधारक आपले वाहन पार्क करून गेल्यानंतर त्यांच्यावर नजर ठेवत दुचाकी पळविल्या जात आहेत. लातूर जिल्ह्यात दिवसाला किमान एक ते दाेन दुचाकी चाेरीच्या घटना घडत आहेत. याबाबत त्या-त्या पाेलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र, चाेरट्यांचा सुगावा लागत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून टाेळीतील काही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता औसा तालुक्यातील दाेघा दुचाकी चाेरट्यांना पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या आहेत.

अनेक दुचाकींची लावली काही हजारात विल्हेवाट...लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून पळविण्यात आलेल्या वाहनांची काही हजारांमध्ये विल्हेवाट लावणारी टाेळी सक्रिय आहे. दुचाकी चाेरल्यानंतर काही वेळात तिचे पार्टस् काढून स्वतंत्र केले जातात. त्या पार्टसची विक्री केली जात असल्याचे समाेर आले आहे. तर वाडी-तांडे, खेड्या-पाड्यात केवळ दहा ते पंधरा हजारांत दुचाकीची विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे.

कमी पैशांत दुचाकी घेतली; पाेलिस चाैकशीत अडकले...औसा तालुक्यातील खेड्यात एक नव्हे तब्बल दहा ते पंधरा जणांनी चाेरीच्या दुचाकी कमी दामात मिळत असल्याच्या लालसेतून घेतल्या आहेत. वाहन चाेरणाऱ्या टाेळीतील दाेघांना उचलल्यानंतर या दुचाकी खेरी करणाऱ्यांची नावे समाेर आली आहेत. आता त्यांचीही चाैकशी सुरु आहे. कमी दामात दुचाकी घेतले अन् पाेलिसांच्या चाैकशीत अडकले, अशीच काेंडी झाली आहे.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर