शिवाजीराव कोंडमगिरे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:55 IST2021-02-20T04:55:04+5:302021-02-20T04:55:04+5:30

श्रेया मुंडे हिचे यश लातूर : सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत राजा नारायणलाल लाहोटी ...

Selection of Shivajirao Kondmagire | शिवाजीराव कोंडमगिरे यांची निवड

शिवाजीराव कोंडमगिरे यांची निवड

श्रेया मुंडे हिचे यश

लातूर : सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत राजा नारायणलाल लाहोटी स्कूलची विद्यार्थिनी श्रेया गणपती मुंडे हिने यश मिळविले आहे. या यशाबद्दल प्राचार्य कर्नल एस. ए. वर्धन यांनी तिचा सत्कार केला. यावेळी गणपती मुंडे, स्वाती केंद्रे, विक्रम माने, गजानन जोशी, विनोद चव्हाण यांची उपस्थिती होती.

११२१ ग्रंथांची भेट

लातूर : दयानंद कला महाविद्यालय हिंदी विभागाचे प्रथम विभागप्रमुख डाॅ. सदाविजय आर्य यांनी ११२१ ग्रंथ आणि ३० मासिके महाविद्यालयास भेट दिली. यावेळी संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, अरविंदराव सोनवणे, सचिव रमेश बियाणी, सुरेश जैन, ललितभाई शहा, प्राचार्य डाॅ. एस. पी. गायकवाड, नवनाथ भालेराव, श्रीकांत जोशी, दिलीप गिरबने, तुकाराम सूर्यवंशी आदींसह प्राध्यापकांची उपस्थिती होती.

Web Title: Selection of Shivajirao Kondmagire