हत्तरग्याच्या सरपंचपदी भाग्यश्री बोटले यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:42+5:302020-12-06T04:20:42+5:30
... ५९ हेक्टरवर औशात हरभऱ्याचा पेरा औसा : यंदा तालुक्यातील जलसाठे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून ...

हत्तरग्याच्या सरपंचपदी भाग्यश्री बोटले यांची निवड
...
५९ हेक्टरवर औशात हरभऱ्याचा पेरा
औसा : यंदा तालुक्यातील जलसाठे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या असून तालुक्यात ५९ हजार ३८३ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला आहे. सध्या हे पीक बहरले आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्र १ लाख २१ हजार ९९९ हेक्टर आहे. त्यात लागवडीयोग्य क्षेत्र १ लाख ११ हजार ८१३ हेक्टर आहे. यंदा तालुक्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला आहे. तसेच ज्वारी ८ हजार ३४८ हेक्टर, मका ६८२, गहू ३ हजार ६३१, जवस ४४, सूर्यफूल ६२, करडई १ हजार ९१३ हेक्टरवर पेरा झाला आहे.
...
पांढरवाडी येथे शेतकरी मेळावा
शिरूर अनंतपाळ : पांढरवाडी येथील मदन तांबोळकर यांच्या शेतावर शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी पुण्याच्या राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेचे कार्यवाह अनिल व्यास यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे व महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी संजय नाब्दे होते. यावेळी प्रभाकर बरदाळे, भाऊराव पाटील, दत्तात्रय कुलकर्णी, भरत दंडिमे, शिवहार कोटे, पंढरी मलामले, उत्तम पुरी, मल्लिकार्जुन तांबोळकर, बाबूराव गलबले, भीमराव हारनुळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
...